Shetkari karjmafi 30 June ; शेतकरी कर्जमाफी 30 जून आधीच, अजीत पवारांनी स्पष्टीकरण.
Shetkari karjmafi 30 June ; शेतकरी कर्जमाफी ३० जून पूर्वीच होणार? अजीत पवारांनी स्पष्टच सांगितले.. ; गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये कर्जमाफी संदर्भात दिलासा आणि हिरमोड असा संमिश्र अनुभव येत आहे. नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांनी सातत्याने कर्जमाफीची मागणी केली होती. या मागणीनुसार, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकरी नेत्यांना ३० जून पूर्वीच कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते.
या आश्वासनानंतर एक समितीही गठीत करण्यात आली आणि त्यासंबंधीचा जीआर (शासकीय निर्णय) देखील निर्गमित झाला. मात्र, या प्रक्रियेतच काही वादग्रस्त वक्तव्ये समोर आल्यामुळे कर्जमाफी होणार की नाही, याबद्दल शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.
अखेर, या संभ्रमाला पूर्णविराम देत राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनी एका कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात स्पष्ट शब्द दिला आहे की, शेतकऱ्यांची कर्जमाफी ३० जून पूर्वीच केली जाईल. त्यांनी या संदर्भातला निश्चित कालावधी आणि प्रक्रिया स्पष्ट केली आहे. त्यानुसार, येणाऱ्या आर्थिक वर्षाचे बजेट मार्च महिन्यात मांडले जाईल आणि याच बजेटमध्ये कर्जमाफीसाठी आवश्यक असलेली तरतूद केली जाईल. तसेच, कर्जमाफीसाठी अभ्यास करणारी जी समिती आहे, ती आपला प्रस्ताव एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सादर करणार आहे. या प्रस्तावाच्या आधारावर गरजू आणि पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी ३० जून पूर्वीच पूर्ण करण्याची ग्वाही वित्तमंत्र्यांनी दिली आहे.
या प्रमुख नेत्यांच्या आश्वासनामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत. सध्या तरी शेतकऱ्यांसाठी एक तात्पुरता दिलासा मिळाला आहे, तो म्हणजे कर्ज वसुलीला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तोपर्यंत कर्जाची परतफेड न करता पुढील निर्णयाची वाट पाहणे अपेक्षित आहे. मुख्यमंत्री आणि वित्तमंत्री दोघांकडूनही निश्चित कालावधी मिळाल्यामुळे सरकार या घोषणेवर किती तत्परतेने अंमलबजावणी करते, याकडे आता सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.