Nuksaan bharpaai madat ; तुम्हाला नुकसान भरपाई मदत मिळाली का? असं चेक करा.
Nuksaan bharpaai madat ; शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत व पुनर्वसन विभागाकडून दिली जाणारी मदत कोणत्या बँक खात्यात जमा झाली आहे, हे पाहण्यासाठी संकेतस्थळ सुरू केले आहे. राहिलेल्या शेतकऱ्यांना मदत का मिळाली नाही?, त्याचे मूळ कारण काय?, हे आता स्वत:च्या मोबाईलवर पाहता येणार आहे. प्रत्येक तहसील कार्यालयाने त्या याद्या तलाठ्यांच्या मोबाईलवर पाठविल्या आहेत.
काहीजण तहसीलदारांनाही संपर्क साधत आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना त्यांच्या मदतीची सद्य:स्थिती स्वत:च्या मोबाईलवर पाहता यावी म्हणून मंडलनिहाय ऑनलाइन याद्या काढण्यात आल्या आहेत. त्यावर शेतकऱ्यांचा ‘व्हीके’ क्रमांक टाकून सर्च केल्यास त्या शेतकऱ्याला भरपाई का मिळाली नाही? याचे उत्तर मिळणार आहे. त्याठिकाणी बॅंक खाते क्रमांक, मदतीची रक्कम व प्रलंबित राहण्याचे नेमके कारण देखील पाहता येणार आहे.
















