पंजाब डख यांचा हवामान अंदाज राज्यात पाऊस येणार का?
पंजाब डख यांचा हवामान अंदाज राज्यात पाऊस येणार का?
Read More
नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८वा हप्ता कधी येणार.
नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८वा हप्ता कधी येणार.
Read More
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक/अपडेट करा घरबसल्या
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक/अपडेट करा घरबसल्या
Read More
सेनयार’ के बाद, बंगाल की खाड़ी में नए तूफान की आहट
सेनयार’ के बाद, बंगाल की खाड़ी में नए तूफान की आहट
Read More
कोनत्याही महीला अपात्र नाहीत, अफवांवर विश्वास ठेऊ नका.
कोनत्याही महीला अपात्र नाहीत, अफवांवर विश्वास ठेऊ नका.
Read More

राज्यात गारपीटीचा अंदाज, पहा कधीपासून..? मच्छिंद्र बांगर

राज्यात गारपीटीचा अंदाज, पहा कधीपासून..? मच्छिंद्र बांगर

डॉ. मच्छींद्र बांगर यांच्या हवामान अंदाजानुसार, नोव्हेंबर महिन्याच्या उर्वरित कालावधीत महाराष्ट्रात दोन टप्प्यात हलक्या पावसाचे वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. पहिला टप्पा साधारणपणे २३ आणि २४ तारखेच्या आसपास असेल, जेव्हा अरबी समुद्रात केरळ ते गोव्याच्या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र विकसित होईल. या प्रणालीमुळे पुणे, दक्षिण सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागांत ढगाळ हवामान आणि हलक्या सरींची शक्यता आहे, तसेच सोलापूरच्या काही भागांतही परिणाम दिसू शकतो.

ADS खरेदी करा ×

त्यानंतरचा दुसरा टप्पा ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबरच्या दरम्यान असेल. जर या काळात वादळी परिस्थिती निर्माण झाली, तर मराठवाडा (विशेषतः दक्षिण मराठवाडा) आणि विदर्भ (विशेषतः पूर्व विदर्भ) या भागांमध्ये बऱ्यापैकी पाऊस पडू शकतो. मात्र, थंडीतील हवामान प्रणाली कमकुवत असल्याने फार मोठा किंवा मुसळधार पाऊस अपेक्षित नाही; पण काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Comment