शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी: सोयाबीनची हमीभाव केंद्रासाठी ऑनलाईन नोंदणी कशी करावी?
राज्यात सोयाबीनचे दर सध्या हमीभावाच्या (₹५३२८ प्रति क्विंटल) खाली असल्याने, राज्य सरकारने खरेदी सुरू केली आहे. शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीसाठी ई-समृद्धी पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. नाफेडच्या ५५० पैकी सुमारे ४५० खरेदी केंद्रांवर १५ नोव्हेंबरपासून सोयाबीन खरेदीला सुरुवात झाली आहे.
नोंदणीसाठी आवश्यक माहिती आणि प्रक्रिया:
ई-समृद्धी पोर्टलवर मोबाईलवरून नोंदणी करण्याची सोपी पद्धत खालीलप्रमाणे आहे:
१. आवश्यक ॲप्स डाऊनलोड करा:
२. ई-समृद्धी ॲपमध्ये लॉगिन करा:
३. शेतकरी नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण:
-
पुढील पानावर ‘नोंदणी’ या पर्यायावर क्लिक करा.
-
आधार क्रमांक टाका.
-
‘चेहरा प्रमाणीकरण’ (Face Authentication) हा पर्याय निवडा. (जर बायोमेट्रिक मशीन नसेल तर).
-
समोर आलेल्या कॅमेऱ्याने आधार व्हेरिफिकेशन पूर्ण करा. आधारनुसार तुमचा सर्व तपशील (गाव, तालुका, जिल्हा) स्क्रीनवर दिसेल.
-
‘सहाय्यक दस्तावेज’ या पर्यायावर क्लिक करून आधार कार्डचा फोटो अपलोड करा.
-
‘तुम्ही शेतकरी तपशील सुधारू इच्छिता?’ या प्रश्नावर ‘नाही’ वर क्लिक करा.
४. बँकेचा तपशील भरा:
-
‘बँकेचा तपशील’ या ऑप्शनवर क्लिक करा.
-
शेतकऱ्याचे नाव, खातेधारकाचे नाव, आयएफएससी कोड आणि बँक खाते क्रमांक भरा.
-
बँक पासबुकचा फोटो अपलोड करा आणि ‘सबमिट करा’ वर क्लिक करा.
५. योजनेत सहभाग घ्या:
-
मागे येऊन ‘योजनेत सहभाग’ या ऑप्शनवर क्लिक करा.
-
योजनेत ‘PSS Soyabean Procurement Kharif 2025’ हा पर्याय निवडा.
-
जिल्हा, तालुका, गाव, गट क्रमांक/खाते क्रमांक निवडा.
-
जमिनीचा तपशील तपासून घेऊन, ‘स्वतः’ची (Own) मालकी निवडा.
-
जवळचे नाफेड खरेदी केंद्र निवडा.
-
सातबारा चा फोटो अपलोड करा.
-
‘वास्तविक पेरणी क्षेत्र’ (Actual Sowing Area) मध्ये तुम्ही ज्या क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली आहे, ते क्षेत्र नमूद करा.
-
सर्व माहिती भरल्यानंतर ‘यस’ (होय) करून अर्ज सबमिट करा.
-
नोंदणी यशस्वीरित्या सबमिट झाल्यानंतर तुम्हाला अर्ज आयडी असलेले नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही नोंदणीची PDF डाऊनलोड करू शकता.
महत्त्वाच्या तारखा: