पंजाब डख यांचा हवामान अंदाज राज्यात पाऊस येणार का?
पंजाब डख यांचा हवामान अंदाज राज्यात पाऊस येणार का?
Read More
नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८वा हप्ता कधी येणार.
नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८वा हप्ता कधी येणार.
Read More
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक/अपडेट करा घरबसल्या
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक/अपडेट करा घरबसल्या
Read More
सेनयार’ के बाद, बंगाल की खाड़ी में नए तूफान की आहट
सेनयार’ के बाद, बंगाल की खाड़ी में नए तूफान की आहट
Read More
कोनत्याही महीला अपात्र नाहीत, अफवांवर विश्वास ठेऊ नका.
कोनत्याही महीला अपात्र नाहीत, अफवांवर विश्वास ठेऊ नका.
Read More

सोयाबीन दरात पुन्हा तेजी ; भाव 4500 पासून 6500 पर्यंत

राज्यातील सोयाबीन बाजारात आज पुन्हा एकदा विक्रमी दरांची नोंद झाली असून, वाशीम येथे सोयाबीनने तब्बल ६००० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे, तर अकोला आणि मलकापूर येथेही दर ५४००-५५०० रुपयांवर पोहोचले आहेत. मात्र, बाजारातील सूत्रांच्या माहितीनुसार, हे उच्चांकी दर सर्वसामान्य सोयाबीनला मिळालेले नसून, ते केवळ ‘बिजवाई’ म्हणजेच पुढील हंगामासाठी बियाणे म्हणून खरेदी केल्या जाणाऱ्या विशेष प्रतीच्या सोयाबीनला मिळाले आहेत. त्यामुळे, या विक्रमी दरांमुळे शेतकऱ्यांनी दिशाभूल करून घेऊ नये, असे आवाहन तज्ज्ञांकडून केले जात आहे.

ADS खरेदी करा ×

बाजाराचे खरे चित्र लातूरमेहकर आणि जळकोट सारख्या प्रमुख बाजारपेठांनी दाखवून दिले आहे. लातूर येथे १३,३८२ क्विंटलची प्रचंड आवक होऊनही सर्वसाधारण दराने ४६०० रुपयांची पातळी गाठली आहे, तर मेहकर (४५५० रुपये) आणि जळकोट (४७०० रुपये) येथेही दरांनी शेतकऱ्यांना मोठा आधार दिला आहे. एकीकडे काही ठिकाणी तेजीचे वातावरण असले तरी, दुसरीकडे अमरावती येथे ६,६९६ क्विंटलची मोठी आवक होऊनही सर्वसाधारण दर केवळ ४२२५ रुपयांवरच स्थिरावला आहे, ज्यामुळे बाजारातील दरांची विषमता स्पष्ट होते.

Leave a Comment