लाडकी बहीण योजना केवायसी मुद्दत वाढ मिळणार का? पहा सविस्तर माहिती.
अनेक महिलांनी तक्रार केली आहे की, केवायसीसाठी असलेली अधिकृत वेबसाईट (https://ladakibahin.maharashtra.gov.in) अनेकदा लोड होत नाही किंवा ओटीपी वेळेवर मिळत नाही. या तांत्रिक समस्यांमुळे महिलांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या अडचणींची दखल घेत शासनाने आता दैनंदिन केवायसीची क्षमता ५ लाखांवरून १० लाख महिलांपर्यंत वाढवली असली तरी, अंतिम मुदतीत सर्व महिलांची प्रक्रिया पूर्ण होणे आव्हानात्मक दिसत आहे.
मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन
या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, “आतापर्यंत सुमारे ८० लाख महिलांचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे. १८ नोव्हेंबरपर्यंत आणखी लाभार्थी ही प्रक्रिया पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे. मात्र, जर काही कारणास्तव सर्व महिला यात सहभागी होऊ शकल्या नाहीत, तर परिस्थितीचा आढावा घेऊन सरकार निश्चितच योग्य निर्णय घेईल.” त्यांच्या या विधानामुळे केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
















