दोन कमी दाबाचे क्षेत्र तयार राज्यात नोव्हेंबरच्या शेवटी पावसाचा अंदाज.
दोन कमी दाब, वातावरणात होनार मोठा बदल – तोडकर हवामान अंदाज ; तोडकर हवामान अंदाजानुसार, नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मोठ्या पावसाचा कोणताही ‘अलर्ट’ नाही. सध्याच्या अंदाजानुसार, १९ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या काळात फक्त ढगाळ हवामान आणि धुई-धुक्याचे सावट कायम राहील. विशेषतः मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रात ही परिस्थिती जाणवेल, परंतु यामुळे मोठा पाऊस किंवा गंभीर परिस्थिती उद्भवणार नाही. दक्षिण भारतामध्ये (कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू) कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत असल्याने त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटतील, पण या दिवसांमध्ये पाऊस न येता केवळ ढगाळ वातावरन राहन्याची शक्यता आहे. एकूणच, महाराष्ट्रात एक महिन्यापर्यंत पावसाचा मोठा ‘धोका’ नाही अशी माहिती तोडकर यांनी दिली आहे.
नोव्हेंबरमध्ये एकापाठोपाठ दोन कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहेत, त्यापैकी एक १६ नोव्हेंबरच्या आसपास सक्रिय होईल आणि दुसरे २६-२७ नोव्हेंबरच्या सुमारास. तथापि, या दोन्ही क्षेत्रांचा महाराष्ट्रावर फारसा मोठा प्रभाव पडणार नाही. डिसेंबर महिन्याची सुरुवात देखील पावसाळी नसेल. थंडीमुळे ढग तयार होण्यासाठी पोषक परिस्थिती नसल्याने येत्या २० दिवसांत मोठा पाऊस येण्याची शक्यता नाही. मात्र, दीर्घकालीन अंदाजानुसार जानेवारी २०२६ च्या शेवटच्या आठवड्यात राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (तोडकर हवामान अंदाज)
















