चक्रीवादळ तयार, वातावरणात होनार मोठा बदल, पंजाब डख
पंजाब डख यांच्या अंदाजानुसार, सध्या संपूर्ण महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील. राज्यात पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी आणि खानदेश या सर्व विभागांमध्ये सध्या पावसाचे कोणतेही मोठे वातावरण नाही.
त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी ही रब्बी पिकांची पेरणी करण्यासाठी अत्यंत योग्य वेळ आहे. ज्या शेतकऱ्यांची हरभरा आणि गहू पेरणी करायची बाकी आहे, त्यांनी कोणतीही चिंता न करता पेरणी पूर्ण करावी. राज्यात सध्या थंडीचे वातावरण असून, हे वातावरण पेरलेल्या पिकांच्या वाढीसाठी अनुकूल ठरणारे आहे.
चक्रीवादळामुळे वातावरणात अपेक्षित बदल
सध्या बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ सक्रिय आहे. हे चक्रीवादळ तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश मार्गे केरळ, कर्नाटक अशा पद्धतीने अरबी समुद्राच्या दिशेने पुढे सरकेल. या प्रणालीच्या प्रभावामुळे, महाराष्ट्रात काही अंशी वातावरणात बदल होण्याची चिन्हे आहेत. राज्यात लवकरच काही काळ ढगाळ वातावरण तयार होऊ शकते. शेतकऱ्यांनी या ढगाळ वातावरणाची नोंद घ्यावी आणि त्यानुसार शेतीचे व्यवस्थापन करावे.
राज्याच्या विशिष्ट भागांत तुरळक पावसाची शक्यता
चक्रीवादळ पुढे सरकत असताना, त्याच्या एका भागामुळे राज्याच्या विशिष्ट भागांत तुरळक पावसाचा अंदाज आहे. असा खूप मोठा पाऊस पडण्याची शक्यता सध्या नाही. मात्र, जर पाऊस पडला तर त्याचा प्रभाव प्रामुख्याने नांदेड, यवतमाळ, परभणी, हिंगोली, लातूर, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांसह कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या सीमेलगतच्या परिसरावर राहू शकतो.
महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता सध्या तरी नाही. थंडीचे प्रमाण चांगले राहील आणि शेतकऱ्यांनी पेरणीची कामे पूर्ण करावीत, असा सल्ला पंजाब डख यांनी दिला आहे.