नाशिकमध्ये बियाणांसाठीच्या लाल कांद्याला ₹३००० पर्यंत दर; उन्हाळी कांद्याच्या साठवण क्षमतेवर प्रश्नचिन्ह
आज चंपाषष्ठी असल्यामुळे, यानंतर महाराष्ट्रभर कांद्याची मागणी वाढू शकते, असा व्यापाऱ्यांचा आणि बाजार व्यवस्थेचा अनुभव आहे. या पार्श्वभूमीवर, लाल आणि उन्हाळी कांद्याचे बाजारभाव कसे राहतील, याचे विश्लेषण करण्यात आले आहे.
लाल कांद्याच्या बाजारभावाचा सध्याचा कल
बाजारात सध्या बियानांसाठीच्या लाल कांद्याची खरेदी सुरू आहे आणि याच कारणामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये नवीन लाल कांद्याला चांगला बाजारभाव मिळत आहे. नाशिकमधील उमराणे, लासलगाव, पिंपळगाव आणि कळवण बाजार समित्यांमध्ये बिजवाईसाठी किंवा बियाणांसाठीचा चांगल्या प्रतीचा लाल कांदा तब्बल ₹३,००० पर्यंत प्रति क्विंटल दराने विकला जात आहे.
सरासरी दर: हा ₹३,००० चा दर केवळ मोजक्या लॉटना मिळत असला तरी, नवीन लाल कांद्याचा सरासरी बाजारभाव ₹१,२०० ते ₹१,५०० प्रति क्विंटलच्या आसपास टिकून आहे. नाशिकमध्ये लाल कांद्याचे किमान दर ₹८२५ आणि सरासरी दर ₹१,२०० च्या आसपास आहेत, तर चांगल्या क्वालिटीच्या निर्यातक्षम कांद्याला ₹२,००० ते ₹३,००० पर्यंत दर मिळत आहेत.
उन्हाळी कांद्याच्या विक्रीचा निर्णय आणि साठवण क्षमता
उन्हाळी कांद्याच्या विक्रीसाठी सध्याचा काळ हा ‘गोल्डन पिरियड’ असल्याचे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत. कारण, यंदाच्या अचानक बदललेल्या हवामानामुळे (अचानक पाऊस आणि थंडी) उन्हाळी कांद्याची साठवण क्षमता (Storage Capacity) आता कमी होत चालली आहे. अनेक ठिकाणी उन्हाळी कांद्याला कोंब येऊ लागले आहेत. श्रीलंकेला तसेच दुबईच्या मार्केटमध्ये जाणाऱ्या कंटेनरमधील उन्हाळी कांद्यालाही कोंब आल्याच्या तक्रारी आल्या आहेत. वाहतुकीदरम्यान तापमान नियंत्रित न राहिल्यास (AC कमी-जास्त झाल्यास) कांद्यावर परिणाम होतो. त्यामुळे, शेतकऱ्यांनी आता सावध राहण्याची गरज आहे.
मागणी आणि दर: देशामध्ये दोन दिवसांपूर्वी कांद्याचे बाजारभाव ₹१,००० वरून ₹१,५०० पर्यंत वाढले होते, पण काल ते पुन्हा घसरलेले दिसून आले. उन्हाळी कांद्याच्या संदर्भात शेतकऱ्यांनी आता विक्रीचा निर्णय घेण्याचे ठरवावे. लाल कांद्याचे बाजारभाव मात्र येणाऱ्या काळात स्थिर राहतील आणि त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
जिल्हावार सरासरी बाजारभाव (२५ नोव्हेंबर)
-
अहमदनगर (लाल कांदा): किमान दर ₹३००, सरासरी दर ₹१,४०५
-
अहमदनगर (उन्हाळी कांदा): किमान दर ₹३५०, सरासरी दर ₹१,०८५
-
पुणे (लोकल कांदा): सरासरी दर ₹१,०१७
-
पुणे (चिंचवड कांदा): सरासरी दर ₹१,५००
-
सोलापूर: सरासरी दर ₹१,०००