घाबरु नका पावसाची चिंता नाही; फक्त या भागात पाऊस… गजानन जाधव

शेतकरी बंधूंनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तुरळक पावसाचे अंदाज देऊन शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण केली जात असली तरी, महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाची कोणतीही शक्यता नाही. दिनांक २४ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू होणारा हा आठवडाही पूर्णपणे कोरडा राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची किंवा चिंता करण्याची गरज नाही अशी माहिती गजानन जाधव यांनी दिली आहे.
केवळ गोवा आणि संलग्न भागात तुरळक पाऊस
राज्याच्या प्रमुख भागांमध्ये कोरडे हवामान असले तरी, फक्त गोवा आणि त्याला लागून असलेल्या परिसरामध्ये, जसे की रत्नागिरी आणि कोल्हापूरच्या काही भागांत, हलका आणि तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागांव्यतिरिक्त, विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र या महत्त्वाच्या विभागांमध्ये कुठेही पावसाचा अंदाज नाही. त्यामुळे, या भागातील शेतकऱ्यांनी सध्याच्या हवामानाचा फायदा घेऊन शेतीची कामे करावीत.
थंडी आणि तापमानाचा अंदाज
सध्या थंडीत थोडीशी घट झाली आहे, म्हणजे तापमान ३ ते ४ अंशांनी कमी झाले आहे. ही परिस्थिती साधारणपणे शुक्रवार (२८ नोव्हेंबर) पर्यंत अशीच कायम राहील. मात्र, शुक्रवारपासून पुढे तापमानात पुन्हा थोडीशी घट होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे थंडीमध्ये वाढ होऊ शकते. शेतीसाठी अनुकूल असे हे हवामान असल्यामुळे पिकांचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.(गजानन जाधव)