इथिओपियात १२ हजार वर्षांनंतर ज्वालामुखीचा उद्रेक; ताशी १३० किमी वेगाने राखेचे ढग भारतावर.
भारतावर गंभीर संकट: राखेच्या बारीक कणांमुळे अनेक विमान उड्डाणे रद्द; राजस्थान, दिल्लीत ‘धुळीचे साम्राज्य’
इथिओपियामध्ये तब्बल १२ हजार वर्षांनंतर ज्वालामुखीचा अचानक उद्रेक झाला असून, यामुळे भारतावर मोठे संकट घोंगावत आहे. या उद्रेकातून निघालेला धूर सुमारे १५ किलोमीटर उंचीपर्यंत पोहोचला आहे. ही राख लाल समुद्र पार करत येमेन आणि ओमानपर्यंत पसरलेली आहे. राखेच्या ढगांचे हे संकट आता भारतापर्यंत येऊन पोहोचले असून, हे ढग ताशी १३० किलोमीटर वेगाने भारतात पोहोचले आहेत, ज्यामुळे देशभरात अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भारतातील वातावरण आणि विमान उड्डाणांवर परिणाम.
या उद्रेकाचा मोठा परिणाम भारताच्या वातावरणावर झाला आहे. अनेक ठिकाणी धुळीचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. राखेचे हे ढग राजस्थानमधील जोधपूर आणि जैसलमेरमध्ये पोहोचले असून, त्यानंतर ते दिल्लीच्या दिशेनेही सरकले आहेत. राखेचे हे बारीक कण विमानाच्या इंजिनांना गंभीर नुकसान पोहोचवू शकतात आणि बाधा निर्माण करू शकतात. याच कारणामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अनेक विमान उड्डाणे रद्द करण्याची वेळ भारतावर आली आहे.
















